शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय गणवेशाचे फलक दुकानदारांनी स्वत:हून काढले-उघड-उघड गणवेश देणे बंद : मागील दरवाजाने दुकानात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:41 IST

गणवेश सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्यानंतर शहरातील दुकानांसमोर लावलेले फलक हटविण्यात आले आहेत.

सातारा : गणवेश सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्यानंतर शहरातील दुकानांसमोर लावलेले फलक हटविण्यात आले आहेत. तर उघड-उघड गणवेश देणे दुकानदारांनी बंद केले आहे.दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेचे गणवेश आमच्या दुकानात मिळतील, असे फलक लावले जात होते.

यंदाही ही तयारी जवळपास दुकानदारांची पूर्ण झाली होती. मात्र, एका कापड दुकानदाराने शाळा व्यवस्थापन आणि दुकानदारांचे असलेले साटेलोटे उघडकीस आणले. एवढेच नव्हे तर गणवेशातून होत असलेली आर्थिक उलाढालीचे दुकानदार आणि पालकाचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे दुकानदारांची मोठी पंचायत झाली. त्यातच ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्याने दुकानदारांना काहीच हालचाल करता आली नाही.

शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर दुकानाच्या मागच्या दाराने पालकांना गणवेश घेण्यासाठी प्रवेश दिला जात होता. उघड-उघड गणवेश देणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर काचेमध्ये लावलेले गणवेश काढण्यात आले होते; परंतु आतल्या मार्गाने मुलांच्या पालकांना गणवेश दिले जात असल्याचे दिसून येत होते.

माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी मुख्याध्यापकांना नोटिसा देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर दुकानदारांचे धाबे दणाणले. आपापल्या दुकानासमोर अमूक शाळेचे गणवेश मिळतील, असे लावण्यात आलेले फलक दुकानदारांनी कारवाईच्या धास्तीने तत्काळ काढून घेतले.शुक्रवारपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक पालकांनी आपल्या मुलाला अद्याप गणवेश घेतला नाही. शाळा पुन्हा यावर काही तरी विचार करेल, या आशेवर अनेक पालक आहेत.कामगारावर वेगळीच जबाबदारी..दुकानांसमोरील फलक काढून घेण्यात आल्यामुळे अनेक पालक संभ्रमात पडत होते. शाळांनी पालकांना दुकानाचा पत्ता दिला होता. मात्र, दुकानासमोर शाळेचा गणवेश आणि फलक दिसत नसल्यामुळे पालक बुचकाळ्यात पडत होते. काही दुकानांसमोर एक कामगार ठेवण्यात आला होता. हा कामगार विचारपूस करून पालकांना दुकानात सोडत असल्याचे चित्र साताºयात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीSatara areaसातारा परिसर